सोलापूर – मंदिरात समोर झोपलेल्या एका साठ वर्षीय वृद्ध इसमाला दोघा अज्ञातानी काठीने मारहाण केल्याने सदर वृद्ध इसमाचे नाकच छाटले गेल्याची घटना जुना विडी घरकुल येथील कोटा नगरात आज सोमवारी दुपारी बारा वाजता घडली .
अंजय्या नागप्पा पोबत्ती (वय 60 वर्ष , राहणार कोटा नगर ,सोलापूर ) असे त्या जखमी वृद्ध इसमाचे नाव असून ते आज सोमवारी दुपारी कोटा नगर येथील मंदिरा जवळ झोपलेले असताना अज्ञात कारणावरून दोघा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यासोबत भांडण काढून त्यांना काठीने मारहाण केली . या मारहाणीत त्यांचे नाकच छाटले गेले . नाक लोंबकळू लागले असता कोणीतरी एकाने ते लोंबकळणारे नाक रुमालाने चेहऱ्याला बांधले . त्यानंतर तो जखमी वृद्ध घरकुल पासून चालत एकटाच येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी स्वतःच दाखल झाला .याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे .
Post Views: 5