सोलापूर : ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने दुचाकी चोऱ्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोन सराईत चोरट्यांना करून ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या चोरलेल्या ३ मोटार सायकली हस्तगत करण्यात आले आहेत.
ओंकार आनंदा वाघमोडे (वय २२ वर्ष, रा. माळशिरस, जि. सोलापूर) व राजेश वसंत घाडगे (वय २३ वर्ष, रा. अकलूज, ता. माळशिरस) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .
ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील व त्यांचे पथक दि. २० जून रोजी पंढरपूर उपविभागात गस्त घालत असताना, अंमलदार समर्थ गाजरे यांना आरोपी ओमकार वाघमोडे हा चोरीची बाईक घेऊन पंढरपूरकडून माळशिरसकडे वाखरी मार्गे माळशिरस कडे जात असल्याची माहिती मिळाली. माहितीप्रमाणे पोलिसांनी तात्काळ वाखरी येथील पालखी तळावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता, त्याने ही गाडी नवी पेठ, पंढरपूर येथील एका हॉटेल समोरून त्याचा साथीदार राजेश घाडगे याच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींकडून १ लाख ३५ हजारांच्या ३ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रमाणे पोलिसांनी या चोरट्यांकडून पंढरपूर शहर, पंढरपूर ग्रामीण, सांगोला आणि हडपसर पुणे येथून दुचाकी चोरी केल्याचे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, अंमलदार सागर ढोरे-पाटील, यश देवकते, समर्थ गाजरे, अनवर अत्तार आणि दिलीप थोरात यांनी पार पाडली आहे का.