सोलापूर – येथील अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिपीनभाई पटेल यांच्यासह इतर उमेदवार विजयी झाले. यामध्ये बहुसंख्य संचालक मागील संचालक मंडळातील होते. दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण 12 उमेदवार होते. यापूर्वी 2 महिला, 1 कर्नाटक राज्यातून, 1 धाराशिव लातूर यामधून व 1 अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
गुरुवार दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी महेश भवन, सम्राट चौक, सोलापूर येथे मतदान प्रक्रिया पार पडली. शनिवार दि.24 ऑक्टोबर 2026 रोजी महेश भवन, सम्राट चौक, सोलापूर येथे सकाळी 8.00 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. दुपारी 12 पर्यंत अंतिम निकाल जाहीर करण्यात आले.
उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी खालीलप्रमाणे –
– करवा कौस्तुभ विश्वनाथ — 1,158
– पटेल बिपिनभाई महिजीभाई — 1,153
– पटेल जयेशभाई रमेशभाई — 1,150
– पटेल मेहुल बिपिनभाई — 1,141
– डॉ. प्रधान राजीव मधुकर — 1,141
– पाटील संजीव जयकुमार — 1,138
– डॉ. पाटील विजय काकासाहेब — 1,135
– कोठारी भैरुलाल मोहनलाल — 1,133
– स्वामी चंद्रशेखर सिद्धलिंगय्या — 1,106
– रांभिया मनीष केशवजी — 1,067
– कुचन अरविंद गंगाधर — 172
– राजाराम बसवय्या गोसकी — 105
एकूण मतांची नोंद 11,599 असून 24 मतपत्रिका बाद ठरल्या.
तसेच बिनविरोध निवडून आलेले उमेदवार यशोधाताई डागा (महिला), किशोरी जितेंद्र राठी (महिला), रमेश निवृत्ती व्हटकर (अनुसूचित जाती जमाती), शैलेश जयंतीलाल शहा (धाराशिव लातूर) आणि संपत लक्ष्मीनिवास तापडिया (कर्नाटक राज्य) या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी मा.श्री.एस. कार्तिकेयन व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मा.उपजिल्हाधिकारी (महसूल) श्री.लक्ष्मण कसेकर यांनी काम पाहिले.या निवडणुकीच्या निकालाची औपचारिक घोषणा दि. 5 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात येणार आहे.
Post Views: 6