Friday, September 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कळंबमध्ये भाजपाची ताकद वाढली; ठाकरेंचे ९ आणि काँग्रेसचा एक; १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

तरुण भारतbyतरुण भारत
August 20, 2026
in marathwada
0
कळंबमध्ये भाजपाची ताकद वाढली; ठाकरेंचे ९ आणि काँग्रेसचा एक; १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कळंब – नगर पालिकेतील उबाठा गटाचे नऊ आणि काँग्रेसचा एका अशा एकूण दहा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सोलापूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, धाराशिवचे संपर्कमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे,माजी आमदार सुजितसिंह ठाकूर,जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, मराठवाडा संयोजक नितीन काळे,सुरेशभाऊ देशमुख,नितीन भोसले,सतीश दंडनाईक,उपाध्यक्ष लखन गायकवाड, भाजप गटनेते हर्षद अंबुरे व भाजपाचे नगरसेवक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात भाजपाची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे. या सर्व नगरसेवकांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपसोबत जात असल्याचे जाहीर केले आहे.

कळंब शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक निधी आणणे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणे, हा या भूमिकेमागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेले विकासाचे पर्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राबविल्या जात असलेल्या विविध विकासकामांमुळे प्रभावित होऊन हा निर्णय घेतल्याचे गटनेते संजय मुंदडा यांनी यावेळी बोलताना सांगितले. या पक्षप्रवेशामुळे कळंबसह धाराशिव जिल्ह्यात भाजपाचे वाढते राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. विशेषतः स्थानिक पातळीवर विविध पक्षांतील लोकप्रतिनिधी भाजपच्या विकासाच्या भूमिकेशी जोडले जात असल्याने जिल्ह्यातील भाजपा नेतृत्वावरील विश्वास वाढत असल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे, उबाठा गटाच्या नऊ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना उबाठासमोर कळंबमध्ये आपले राजकीय अस्तित्व आणि संघटनात्मक ताकद टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. कळंबच्या विकासाला सक्षम नेतृत्वाची साथ आणि भाजपच्या वाढत्या संघटनशक्तीला मिळणारा लोकप्रतिनिधींचा प्रतिसाद, यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाली आहे. यावेळी कळंब नगर पालिकेतील गटनेते संजय मुंदडा यांच्यासह नगरसेवक सागर मुंडे, सफूरा शकील काझी, जमील महंमद खाटीक, इंदुमती जयनंदन हौसलमल, रुखसाना चांदसाब बागवान, वनमाला शंकर वाघमारे, आशा सुधीर भंवर, ज्योती दीपक हारकर व काँग्रेसच्या अर्चना प्रताप मोरे आदींनी गुरुवारी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. कळंब नगरपालिकेत भाजपचे ६ सदस्य निवडून आले आहेत. शिंदे सेनेचा नगराध्यक्ष आणि ४ सदस्य आहेत. तर ठाकरे सेनेचे ९ आणि काँग्रेसचा एक असे एकूण २० सदस्य निवडून आले होते. आता पूर्वीचे ६ आणि आत्ता पक्षात आलेले दहा असे भाजपचे एकूण १६ इतके संख्याबळ झाले आहे. त्यामुळे कळंब नगरपालिकेत आता विरोधकच शिल्लक राहिले नाहीत.

मल्हार पाटील यांची निर्णायक भूमिका

कळंबमधील या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीमागे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरली आहे. नगरसेवकांशी सातत्याने संवाद साधत त्यांनी त्यांच्या स्थानिक अडचणी आणि विकासाच्या गरजा समजून घेतल्या. केवळ राजकीय प्रवेशापुरता विषय न ठेवता, कळंबच्या विकासाला गती देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज त्यांनी पटवून दिली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून कळंबच्या विकासाला अधिक बळ मिळू शकते, हा विश्वास नगरसेवकांमध्ये निर्माण करण्यात मल्हार पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या संवादातून विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला आणि त्यातूनच भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय अधिक ठाम झाला. युवा ऊर्जा, प्रभावी संवाद आणि विकासाची स्पष्ट भूमिका यांचा सुरेख मेळ साधत मल्हार पाटील यांनी कळंबच्या राजकारणात भाजपसाठी नव्या राजकीय समीकरणांची पायाभरणी केली आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या या प्रवेशामागील खरे सूत्रधार मल्हार पाटील असल्याचे त्यांच्या निर्णायक आणि प्रभावी भूमिकेतून अधोरेखित झाले आहे.

Post Views: 55
Previous Post

बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये सद्भावना व राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन उत्साहात

Next Post

बार्शीच्या आकाश अतनूरकर यांची अमेरिकेत पीएच.डी.साठी निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बार्शीच्या आकाश अतनूरकर यांची अमेरिकेत पीएच.डी.साठी निवड

बार्शीच्या आकाश अतनूरकर यांची अमेरिकेत पीएच.डी.साठी निवड

ताज्या बातम्या

माढ्याच्या पाण्यासाठी पुन्हा संघर्ष;पाटबंधारे विभागाच्या आश्वासनांनंतरही पाणी गायब!

माढ्याच्या पाण्यासाठी पुन्हा संघर्ष;पाटबंधारे विभागाच्या आश्वासनांनंतरही पाणी गायब!

September 4, 2026

ग्रामसेवकांच्या कालबद्ध पदोन्नतीचा मार्ग मोकळा; सप्टेंबरअखेर निर्णय – डेप्युटी सीईओ सूर्यकांत भुजबळ 

September 4, 2026
नेत्रदानातून प्रकाश देणाऱ्यांचा सन्मान, प्रेरणादायी संवादातून नव्या पिढीला दिशा

नेत्रदानातून प्रकाश देणाऱ्यांचा सन्मान, प्रेरणादायी संवादातून नव्या पिढीला दिशा

September 4, 2026

शिक्षकांच्या हातातील खडू हरवला; मोबाईलवर ‘डेटा एन्ट्री’चा भार!

September 4, 2026

दुष्काळ जाहीर करा; सोयाबीनला हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्या

September 4, 2026
सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचा जल्लोष; पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचा जल्लोष; पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

September 4, 2026

खुनातील आरोपीने इच्छामृत्यू मिळणे बाबत केला न्यायालयात अर्ज! 

September 4, 2026
अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘मातीचा गणपती’ उपक्रम

अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘मातीचा गणपती’ उपक्रम

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1162512

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!