टेंभुर्णी – अकोले (खुर्द) ता. माढा येथील मा. बबनरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती (IAS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.
सातारा येथील भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा संस्थेमार्फत २५ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
यामध्ये कु. श्रेया जोतीराम पाटील हिने इयत्ता ५ वीमध्ये ३०० पैकी २३८ गुण मिळवत जिल्ह्यात १२ वा क्रमांक पटकावला. तसेच चि. प्रभास धनाजी शिंदे याने ३०० पैकी २३४ गुणांसह जिल्ह्यात १४ वा क्रमांक मिळवला. याशिवाय चि. रणवीर अमितकुमार पाटील याने ३०० पैकी २१८ गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला, तर कु. प्रतिक रामचंद्र पाटील हिने ३०० पैकी २०८ गुण मिळवत केंद्रात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. धनुसिंग रजपूत सर व जहागीरदार मॅडम यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल करमाळा तालुक्याचे माजी आमदार तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. संजयमामा शिंदे, संस्थेचे सचिव व प्रशालेचे प्राचार्य मा. श्री. राजेंद्र अभिमान ठोंबरे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. संभाजी अनपट सर, स. रा. मोरे प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरच्या प्राचार्या सौ. मधुरा सुरवसे मॅडम तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे अकोले (खुर्द) परिसरात आनंदाचे वातावरण असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.



















