बार्शी – तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा मागील सहा महिन्यांपासून पाठलाग करुन तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका युवकावर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित युवकाने पिडीत मुलीचा हात धरुन तिच्यावर दबाव टाकल्याचा तसेच तक्रार केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, सुमारे सहा महिन्यांपूर्वी आरोपी पीडितेच्या घरी येऊन तू मला आवडते, तसेच फोनवर बोलल्यास सांगितले. त्यानंतर तो तिचा पाठलाग करु लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी गावाच्या शिवारात आरोपी मोटारसायकलवरुन पीडितेजवळ येऊन भेटण्याचा व फोनवर बोलण्याचा दबाव टाकला. तसेच तक्रार केल्यास पोलिसांमध्ये आपली ओळख असल्याचे सांगून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास पोसई सोनटक्के करीत आहेत.
Post Views: 13