सांगोला – मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कार्यतपस्वी आ.काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या तर्फे नक्षत्र मंगल कार्यालय, मेथवडे फाटा येथे आयोजित करण्यात आलेल्या चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरात हजारो वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन डॉ.प्रदीप साळुंखे पाटील, विजयराव देशमुख यांनी केले. यावेळी बाळासाहेब एरंडे, तानाजी पाटील, नगरसेविका तनुजा एरंडे, डॉ.सचिन गवळी, डॉ.राज मिसाळ, अभिजित नलवडे, अमोल नलवडे उपस्थित होते. याप्रसंगी माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पंढरीला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांचे पायाला आयुर्वेदिक तेल लावून मालिश करून चरणसेवा केली. यावेळी डॉ.पियुष साळुंखे पाटील यांच्यासह सह्याद्री फार्मसी कॉलेज, मेथवडे आणि फॅबटेक फार्मसी कॉलेज, सांगोला येथील विद्यार्थी तसेच शिक्षकांनी वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा दिली.


















