बार्शी – तालुक्यातील उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची भारतीय लष्कर आणि पोलीस दलात स्थान मिळवून विद्यालयाचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे. या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय लष्करात (आर्मी) निवड झालेले खाजा दाऊद बाबूलाल बागवान, पुणे शहर पोलीस पदी निवड झालेले अमन रहिमान मुलाणी आणि सोलापूर शहर पोलीस पदी निवड झालेली कुमारी नंदिनी घायतिडक या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांच्या हस्ते फेटा ,शाल ,बुके ,व पुस्तके देऊन गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास आणि यश ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. लष्करात भरती झालेल्या खाजा बागवान याने देश सेवेचे स्वप्न पूर्ण केले, तर अमन मुलाणी आणि नंदिनी घायतडक यांनी पोलीस दलात प्रवेश मिळवून खाकी वर्दीचा मान वाढवला आहे.
या सत्कार समारंभाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्रशालेचे सहशिक्षक दत्तात्रेय राऊत, प्रशांत काशीद, अनिल वैद्य, नामदेव महाले, राठोड, मकरंद जगदाळे, रेवनसिद्ध दुलंगे आणि वाघ उपस्थित होते . सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करुन त्यांच्या जिद्दीला सलाम केला.
या यशामुळे उपळे दुमाला परिसरात आणि वखारिया विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सत्काराला उत्तर देताना यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय गुरुजन,अभ्यासातील सातत्य आणि पालकांना दिले.


















