अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांचा अहिल्यानगर येथे भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.
अहिल्यानगर येथे बांधकाम व्यवसायिक व प्रतिष्ठीत उद्योगपती सागर देवकर, अशोक देसर्डा, गणेश राजपूरे, ॲड.विक्रम वाडेकर परिवारच्या वतीने अशोक देसर्डा, सागर देवकर यांच्या हस्ते
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरातील स्वामी सेवा व सलग ६ व्या टर्ममध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल
नगरसेवक महेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी देवकर, देसर्डा,
राजपूरे कुटुंबीयांचेही श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन महेश इंगळे यांनी यथोचित सत्कार केला.
यावेळी श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, सुनिल पवार, तुषार मोरे, स्वामीराव मुसळे, प्रा.संतोष जाधव फुटाणे, ॲड.विक्रम वाडेकर, प्रशांत राजपूरे, अभिजीत देशमुख, मयूर मेढे आदींसह
देवकर, देसर्डा व राजपूरे कुटूंबीय उपस्थित होते.
Post Views: 175