सोलापूर – राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिका क्रीडा विभाग यांच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत सोलापूर शहरातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदवला. ही रॅली चार हुतात्मा ते सात रस्तापर्यंत झाली. या रॅलीत पोलीस उपनिरीक्षक गौस शेख व सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महानगरपालिका क्रीडा अधिकारी नजीर शेख , शहर सचिव प्रा. प्रमोद चुंगे, जैन गुरुकुल प्रशालेचे क्रीडाशिक्षक पंडित ,अमित कोर्टीकर, शितलकुमार शिंदे, श्री.बेडगे, प्रथमेश हिरापुरे,, प्रशांत व सोलापूर शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 2