मोडनिंब – (ता. माढा) येथील ग्रामदैवत श्री वेताळ देवस्थान यात्रेमुळे गावात भाविक व पाहुण्यांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला असून नागरिकांना गैरसोय होऊ नये, नियमित वेळेवर पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच यात्रेदरम्यान रात्रीच्या वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व पथदिवे सुरू ठेवावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात प्रथमेश शिंदे यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊन प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती केली आहे.
या संदर्भात ग्रामविकास अधिकारी कांबळे यांना निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी किरणआबा तोडकरी, रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश आप्पा गिड्डे, ग्रा. प. कर्मचारी संघटनेचे अरुण सुर्वे, ईश्वर हगे आदी उपस्थित होते.


























