Tuesday, May 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संत नामदेव महाराज पालखीचे आळंदीकडे प्रस्थान

तरुण भारतbyतरुण भारत
November 6, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवा डोळा पाहू ॥ कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी तिर्थक्षेत्र पंढरी नगरीतून श्रीसंत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याने पौर्णिमे दिवशी बुधवारी तिर्थक्षेत्र आळंदीकडे प्रस्थान केले. पालखी सोहळ्यामध्ये सुमारे ५० दिंड्यांसह तीन  हजार वारकरी, भाविक सहभागी झाले आहेत.


प्रारंभी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त गोपाळपूर येथे होणार्या  गोपाळ काल्यासाठी प्रदक्षिणा रोडवरील संत नामदेव मंदिरातून संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा गोपाळपूर येथे गेले. त्याठिकाणी ह.भ.प. नामदास महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. भाविकांनी एकमेकांना काल्याचा प्रसाद देवून गोपाळकाला साजरा केला. त्यानंतर पालखी सोहळा श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी विठ्ठल मंदिरात गेला.त्याठिकाणी श्री विठ्ठल-रुक्मिणीची भेट घेण्यात आली. यावेळी मंदिर समितीच्यावतीने पादुकांचे दर्शन घेवून ह.भ.प. नामदास महाराज यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पालखी सोहळा पुन्हा नामदेव मंदिरात आला.


ये ग ये ग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥
दुपारचे भोजन व विश्रांती घेतल्यानंतर पालखी सोहळ्याने ज्ञानोबा-तुकाराम, नामदेव-जनाबाई असा गजर करत आळंदीकडे प्रस्थान ठेवले. श्री केशवराज व संत नामदेव महाराजांची आरती करण्यात आली.पालखी सोहळ्यातील मानकर्यां ना मंगळवारीच ह.भ.प.नामदास महाराजांच्या हस्ते मानाचे श्रीफळ देण्यात आले. यावेळी श्री केशवराज संस्थेच्यावतीने पालखी सोहळ्यासाठी अकरा हजार रुपयांची देणगी विश्वस्त राजेश धोकटे सर, जयवंत कांबळे यांच्या हस्ते ह.भ.प. नामदास महाराजांकडे देण्यात आली.


दरम्यान बुधवारी पालखी सोहळा मंदिरातून निघून संत नामदेव पायरी येथे पालखी आल्यानंतर मानाचे अभंग व आरती म्हणण्यात आली. महाद्वार, पश्चिमद्वार, चौफाळा, शिवाजी चौक, अर्बन बँक, सरगम चौक, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयमार्गे हा सोहळा विसावा मंदिर इसबावी येथे आला. येथे विसावा घेवून अभंग, आरती करण्यात आली. यावेळी सेवक राजाभाऊ जवंजाळ, छायाचित्रकार किशोर काकडे यांच्यासह वारकरी व शिंपी समाज बांधव उपस्थित होते.


पालखी सोहळ्यात सर्वात प्रथम नगारखाना त्यानंतर खांद्यावर भगवी पताका घेतलेले वारकरी, टाळकरी, अश्व, घोडेस्वार, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला अशा शाही लवाजम्यासह पंढरी नगरीचा निरोप घेवून पालखी सोहळा आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाला.


पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. माधव महाराज तसेच सर्वश्री ह.भ.प. केशव महाराज, कृष्णदास महाराज, मुकुंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल महाराज, मुरारी महाराज, एकनाथ महाराज, केदार महाराज, भावार्थ, हरी, विणेकरी यांच्यासह समस्त नामदास महाराज परिवार व शिष्यगण पालखी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. या पालखी सोहळ्यासमवेत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांनी पाण्याचा टँकर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे जिल्हा व स्व. तात्या बापट स्मृती समिती चिंचवड यांच्यावतीने भाविकांसाठी मोफत फिरत्या दवाखान्याची (रुग्णवाहिका) सोय करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांची ही सेवा अखंडपणे सुरु असून याबद्दल भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.


आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव। दैवताचे नाव सिध्देश्वर ।।
पंढरपूरहून निघालेला हा पालखी सोहळा भंडीशेगाव, वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण, जेजुरील सासवड, पुणेमार्गे सुमारे आठ दिवसांचा पायी प्रवास करून आळंदी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणार्या् यात्रेत हा पालखी सोहळा सहभागी होणार आहे. पालखीचा मुक्काम आळंदी येथील श्री विष्णू मंदिरात राहणार आहे.

Post Views: 104
Previous Post

शेतकरी बांधवांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

Next Post

प्रमोद महाराज जगताप यांना वारकरी पुरस्कार प्रदान 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

प्रमोद महाराज जगताप यांना वारकरी पुरस्कार प्रदान 

ताज्या बातम्या

विवाहितेचा छळप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल

May 19, 2026

लोकप्रतिनिधींच्या कार्यास अधिकृतता, सुसूत्रता मिळणार  : महापौर कोंड्याल 

May 19, 2026
महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख पुस्तके दाखल

महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख पुस्तके दाखल

May 19, 2026
पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

May 18, 2026
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

May 18, 2026

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कान्समध्ये मराठमोळा अंदाज #viral #maharashtranews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; जिल्हा परिषदेत सीईओ कुशल जैन व उपाध्यक्ष पवार सायकलवरून कार्यालयात #solapurnews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; मनपात महापौर, उपमहापौर ई- बाईकवर तर गटनेता नरेंद्र काळे आले सायकलवर #aajsolapur

May 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0870632

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697