सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव श्री. दशरथजी गोप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सौ. भू.म. पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर येथे विद्यार्थिनींसाठी ड्रेस व खाऊ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. श्री. श्रीनिवास क्यातम होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्रीनिवास कोंडी, विश्वस्त मा. श्री. दिनेश यन्नम, माजी शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री. रावसाहेब भालेराव तसेच माजी प्राचार्य मा. श्री. मधुकर गवळी उपस्थित होते.
यावेळी प्रशालेच्या प्राचार्या सौ. उमा विवेकानंद कोटा,उपमुख्याध्यापक श्री. तुकाराम श्रीराम व पर्यवेक्षक श्री. परमेश्वर बाबळसुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. श्री. रावसाहेब भालेराव यांच्या पुढाकारातून विद्यार्थिनींना ड्रेस व खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह यामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले. वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थिनींसोबत साजरा करण्याचा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.*
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ. उमा कोटा यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. तुकाराम श्रीराम यांनी केले.
Post Views: 6