सालाबादप्रमाणे प्रमाणे यंदाही १२ व्या वर्षी आपल्या प्रभागातील एन जी प्रतिष्ठानच्या वतीने आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन तुळजापूरहून सोलापूर मार्गे कुरुल कामती बेगमपूर मंगळवेढा सांगोला सांगली मिरज कवठे महांकाळ जत आदी जिल्हा व तालुक्यातील आणि सदरील परिसरातील खेडेगावातील आई तुळजाभवानीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविक भक्तांना शनिवार दि १०/१०/२०२६ व रविवार दिनांक ११/१०/२०२६ रोजी शाबुदाणा खिचडी,शाबुदाणा चिवडा, केळी व चहापानी इ. ज्योत घेऊन येणाऱ्या भक्तांच्या आगमनापर्यंत वाटप करण्यात येत असते. तसेच सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही ठेवण्यात आलेली आहे .यंदा १२ व्या वर्षा निमित्त सदरील सोहळा उत्तम पद्धतीने संपन्न करण्यासाठी संस्थापक मा.नागेश गायकवाड ( गवळी )आणि एन. जी. प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व मित्र परिवार अहोरात्र झटत असतात.तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती .
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दक्षिण सोलापूरचे माजी आमदार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय दिलीपरावजी माने मालक यांच्या शुभहस्ते तुळजाभवानीच्या मातेचे पूजन करून करण्यात आले व त्यानंतर आदरणीय मालकांच्या हस्ते सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .याप्रसंगी शहर मध्यचे लोकप्रिय आमदार मा देवेंद्रजी कोठे साहेब यांनी सदर सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली एन जी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा नागेश (गवळी) गायकवाड, शिक्षक संघाचे नेते अनिरुद्ध पवार, दत्तात्रय भोसले ,राजेंद्र माने राम म्हमाणे नागेश खरात मा उमेश गायकवाड मा.तानाजी खरात मा.भाऊसाहेब रोडगे श्रीराम पाटील नितिन गायकवाड चेतन गायकवाड बाबु गायकवाड तानाजी जाधव यांच्यासह N.G. प्रतिष्ठानचे सर्व मित्र परिवार उपस्थित होते.
Post Views: 6