सोलापूर : सम्राट चौक येथील कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण अंतर्गत रावजी सखाराम हायस्कूल येथे विवेक विचार मंच तर्फे शालेय साहित्य वाटप नगरसेवक बिज्जू प्रधाने यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा संयोजिका आश्विनी चव्हाण, कार्यकारणी सदस्य दशरथ वडतीले , अनिकेत प्रधाने , रावजी सखाराम हायस्कूलचे प्राचार्य भारत केत शहर संयोजक सिद्धांत बाबा बाबरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात हायस्कूल आणि प्राथमिक शिक्षक वर्ग कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन गोरे यांनी केले. आभार रमेश वडवराव यांनी मानले.
——


















