सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी प्रताप चव्हाण (सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा) आणि शरणराज केंगनाळकर (दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट विधानसभा) यांची निवड करण्यात आली तसेच सोलापूर महानगरप्रमुखपदी महेश धाराशिवकर यांची निवड करण्यात आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सोलापूरच्या संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी अभिनंदन केले तसेच या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
या नूतन पदाधिकाऱ्यांच्या केल्या निवडी
जिल्हाप्रमुख – धनंजय डिकोळे (माढा, करमाळा), संभाजी शिंदे (सांगोला, पंढरपूर – मंगळवेढा), प्रवीण काकडे (बार्शी, मोहोळ, माळशिरस). लोकसभा प्रमुख – संजय पौळ (सोलापूर लोकसभा), हुकुमचंद राठोड (माढा लोकसभा), सोलापूर महिला संघटिका – मंगल थोरात.


















