
सोलापूर – एम.जे. प्रथम मानव सेवा संस्था व उडान पंख माणुसकी यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू, गरीब व वंचित विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शालेय साहित्य वितरण कार्यक्रम रामानुज कोट हॉल, पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर येथे रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना दप्तर, टिफिन बँग, क्वायर वही, लहान वह्या, पेन, पेन्सिल,स्केच पेन, कंपास बॉक्स तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील उज्ज्वल भविष्याची स्वप्ने हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अंबदास गोरंटला यांची उपस्थिती लाभली. तसेच विश्व हिंदू महासंघ (भारत) संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी नंदकिशोर रामचंद्र झंवर (प्रदेश अध्यक्ष), सतीश अर्जुन आनंदकर आणि महेश अंबादास जिंदम, शिवा पोतन, लक्ष्मण बत्तुल, नरेश सोमा, विनायक कोटा, गोवर्धन वंगा, निखिल चेन्नुर यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. जे. मोहन टालकोकुल, विजय करवा, कन्हैया सोनी, अंकित झंवर, राजेश लाहोटी, महेश कासट, प्रवीण काबरा, धनराज करवा, गणेश दरक, सुमित मर्दा, नरेंद्र करवा आणि उमेश लोया आदी उपस्थित होते.






















