जालना – महाराष्ट्रातील स्वातंत्र सैनिकांना व त्यांच्या वारसाचे मुलामुलीचे, नातवांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी स्वातंत्र सैनिक कुटुंब कल्याण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी स्वातंत्र सैनिक पाल्य युवक समितीचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील कोलते यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत राज्यशासनाचे व केंद्रशासनाचे मिळून जवळपास १७ हजारापेक्षा अधिक स्वातंत्र्य सैनिक व वारस पत्नी असून आज रोजी जवळपास ५ हजाराहून अधिक स्वातंत्र्य सैनिक व वारस पत्नी निवृत्ती वेतन घेत आहेत. परंतु मयात झालेल्या स्वातंत्र्य सैनिक व त्याच्या कुटुंबातील वारस मुला-मुलींना स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची आठवण राहावी व स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसाचे / पाल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “स्वातंत्र्य सैनिक कुटुंब कल्याण आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करावे स्वातंत्र्य सैनिक व नामनिर्देशित पाल्यांचे व वारसांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून आजरोजी नामनिर्देशित व्यक्तींना १९९१ च्या शासन निर्णयाप्रमाणे शासन सेवेत समावून घेण्यात यावे तसेच स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक कुटुंब कल्याण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.
भाजपा महायुती सरकार ने महाराष्ट्र राज्यामध्ये विविध समाजासाठी जवळपास ५२ हून अधिक आर्थिक विकास महामंडळ. त्यांच्या कार्यकाळात स्थापन केल्यामुळे अनेक समाजाचे व आर्थिक दुर्बल घटकांचे व वंचितांचे प्रश्न महामंडळाच्या माध्यमातून सोडविण्यात शासनाची मदत होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबाचे व त्यांच्या वारसाचे मुला-मुलींचे / नातवाचे प्रश्न सोडविण्यासाठी व स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्य सैनिक कुटुंब कल्याण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना व पाल्यांना न्याय द्यावा अशी मागणी बाबासाहेब कोलते यांनी केली आहे.

























