बार्शी – लायन्स क्लब बार्शी रॉयल व लायन्स क्लब बार्शी युनिक यांच्या संयुक्त विद्यमाने ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सौ.हि.ने.न .शाह कन्या प्रशाला बार्शी येथे उदयकुमार पोतदार यांचे ४१ देशातील देश-विदेशातील पोस्ट तिकिटे, पाकीटे, पोस्टकार्ड, नाणी, नोटा, टाकाऊ वस्तुपासुन बनविलेले भेटकार्ड, फस्ट-डे कव्हर्स यांचे भव्य प्रदर्शन, विविध देशातील नाणी ,नोटा,भेटकार्ड ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब बार्शी युनिकचे अध्यक्ष अल्ताफभाई शेख, खजिनदार संतोष जोशी, लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या लायन कावेरी बागुल, ला ज्योती दयानंद रेवडकर, ला. राजेश खाडे, ला. अमित कांकरिया, सौ हि.ने.न. शहा कन्या प्रशालाच्या मुख्याध्यापिका सौ. जोशी मॕडम, मॉडेल हायस्कूलचे काकडे एस ्बी, आदर्श मराठा शाळेच्या श्रीमती कांबळे वैशाली, वृक्षप्रेमीं सुनील फल्ले, प्रथमेश पोतदार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संग्राहक उदयकुमार पोतदार यांचा छंदाबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी मुलांच्या प्रश्नांना छंदाच्या प्रवासाबद्दल उत्तरे दिली. या प्रदर्शनामध्ये तीन शाळेमधील ४५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला . संग्रह बघून मुलांनी समाधान व्यक्त केले. लायन ज्योती रेवडकर यांनी लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याची माहिती व उपक्रमाची माहिती दिली.
Post Views: 5