सोलापूर : जुळे सोलापूर येथील द प्लॅटिनो अपार्टमेंट ( केएलई शाळेजवळ )मधील मीटर खोलीतून इलेक्ट्रिक वायर चोरी करणाऱ्या टोळीचा विजापूर नाका पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेली वायर व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ६ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
६ ऑगस्ट सायंकाळ ते ७ ऑगस्ट सकाळी ७ या कालावधीत ही चोरी झाली होती. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने विजापूर नाका पोलीस स्टेशन कडील डी.बी. पथक प्रमुख सपोनि गायकवाड व डी. बी. पथकातील पोलीस अमलदारांनी घटनास्थळावरील तसेच आसरा चौक, अमन चौक, नई जिंदगी परिसरातील ५० ते ६० सी.सी.टी.व्ही. फुटेज विश्लेषन करून तांत्रिक माहिच्या आधारे एका इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने व त्याचे इतर तीन सहकाऱ्यांसोबत द प्लॅटिनो येथील ठेकेदाराकडे कामाच्या निमित्ताने येऊन इलेक्ट्रिक वायर चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून आर.आर. केबल कंपनीची ९.५ एमएमची ४५ बंडल व ६ एमएमची ५ बंडल वायर जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पो.नि .सुशांत वराळे (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार गायकवाड, सहाय्यक फौजदारआप्पा पवार, पोह सचिन हार, अजय परदेशी, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, पोना. शंकर भिसे, पोकॉ.राजु पवार, समाधान मारकड, अमृत सुरवसे, राहुल विटकर, संतोष माने, शाबोद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटी, रमेश कोर्सेगांव, स्वप्नील जाधव, श्रीरंग काशिद यांनी पार पाडली.
Post Views: 7