पंढरपूर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त “भीमानं माय सोन्यानं भरली ओटी”, “तुम्ही खाता त्या भाकरीवर”, “कुंकू लाविलं रमानं” आदी गीतांच्या बहारदार आणि सुश्राव्य गायनाने देशभरात धुमाकूळ महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या भीम गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन रविवार (दि.१९ )सायंकाळी ५ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, अमन आनंदराज आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन सेना व भीमराव आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणाऱ्या या भीम गीतांच्या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष सागर गायकवाड यांनी केले आहे.























