मंगळवेढा – तामदर्डी येथे शेतात काम करीत असताना एका 45 वर्षीय शेतकर्याच्या पायास साप चावल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून याची नोंद मंगळवेढा पोलीसात झाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील मयत नामदेव सिद्राम पुजारी हे दि.21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता तामदर्डी येथील त्यांच्या शेतात काम करीत असताना त्यांच्या डाव्या पायाला साप चावला होता. या दरम्यान कुटूंबियाने तात्काळ त्यांना मंगळवेढ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र उपचार सुरु असताना ते मयत झाले असल्याचे औदुसिध्द पुजारी यांनी दिलेल्या खबर मध्ये म्हटले आहे. दरम्यान बी.एन.एस.एस कलम 194 प्रमाणे पोलीसात याची नोंद झाली आहे. याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार वंदना घोडके या करीत आहेत.
Post Views: 4