मंगळवेढा – तू माझ्या मुलीला का नांदवत नाही असे म्हणून एका 22 वर्षीय जावायास सासर्याने दगडाने मारुन गंभीर जखमी केल्या प्रकरणी सासरे बलभीम संभाजी शिवशरण,पत्नी सोनाली रविकुमार माने,सासू वंदना बलभीम शिवशरण या तिघा विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील जखमी फिर्यादी रविकुमार माने (रा.कोंडूभैरी गल्ली) ये दि.21 सप्टेंबर रोजी 12.15 वाजता पंढरपूर रोड वरील एका हॉटेल वर वेटरचे काम करीत असताना हॉटेलच्या गेट बाहेर फिर्यादी हे पाण्याचा टँकर खाली करीत होते. त्यावेळी सासरे बलभीम शिवशरण,पत्नी सोनाली माने,सासू वंदना बलभीम शिवशरण तेथे आले व पत्नी सोनाली हिने फिर्यादी पतीस मला तू कधी नांदावयास घेवून जाणार आहे असा जाब विचारत असताना अन्य आरोपींनी तेथे पडलेला दगड फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पोटरीवर,डाव्या पायाच्या नडगीवर मारुन फिर्यादीस गंभीर जखमी केले. त्यावेळेस फिर्यादीची आई रंजना व वडिल महादेव हे भांडणे सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी पत्नी सोनाली हिने फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील 3 ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून काढून घेतल्याचे माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Post Views: 11