मराठी व्यावसायिक रंगभूमीवर प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवत असलेले ‘भुलभुलैय्या’ हे रहस्य, सस्पेन्स आणि थराराने भरलेले नाटक आता रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता, हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे रंगणार आहे.
मुंबई, पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील यशस्वी प्रयोगांनंतर आता सोलापूरच्या रसिकांना या बहुचर्चित नाटकाचा थरार अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. प्रत्येक प्रसंगागणिक वाढणारी उत्कंठा, अनपेक्षित घडामोडी आणि शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कथा हे या नाटकाचे वैशिष्ट्य आहे.
या नाटकात सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे आणि सोलापूर’चां अभिनेता अमीर तडवळकर यांच्यासह इतर अनुभवी कलाकारांचा प्रभावी अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि ध्वनी संयोजन यांचा सुंदर मिलाफ प्रेक्षकांना एक वेगळाच रंगमंचीय अनुभव देतो.
श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन प्रस्तुत या नाटकाला महाराष्ट्रभर उत्कृष्ट प्रतिसाद लाभला असून, सोलापूरमधील नाट्यप्रेमींनी या अविस्मरणीय नाट्यप्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रयोगाचा तपशील
नाटक : “भुलभुलैय्या”
दिनांक : रविवार, १६ ऑगस्ट २०२६
वेळ : सायंकाळी ७.०० वाजता
स्थळ : हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर
तिकीट बुकिंग सुरू आहे. नाट्यप्रेमींनी आपली तिकिटे आगाऊ आरक्षित करून या थरारक नाट्यकृतीचा आनंद घ्यावा. असे आवाहन गुरु वठारे यांनी केले आहे




















