अक्कलकोट – जिल्हा परिषद कन्नड शाळा बाबलाद या शाळेच्या छताचा गिलावा वाळू सिंमेटचा भाग पापुद्रा काही भाग मंगळवारी पडला होता . दोन शिक्षकासह तेरा विद्यार्थी जख्मी झाले होते . विद्यार्थ्यांना तातडीने आवश्यक सर्व उपचार करून घरी सोडण्यात आले आहे . किरकोळ दुखापत झाली आहे सुदैवावाने यामध्ये गंभीर स्वरुपाची इचा कुणाला झालेली नाही . शाळेच्या पोर्च मध्ये विद्यार्थ्यानी दोर लाऊन झोका लावल्याने व दोर मुलांनी ओढल्यांने छताचा गिलावा पावुर्दा पडला आहे स्लॅब कोसळलेला नाही असा खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पंचायत समिती अक्कलकोट येथील गटविकास अधिकारी यांच्या दालनात पत्रकारांसमोर केला . यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य गटविकास अधिकारी शंकर कवितगे , प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख ‘ प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे तालुका वैद्यकीय अधिकारी अश्वीन करजखेडे दयानंद परिचारक आदि पंचायत समिती चे कर्मचारी उपस्थित होते .
दरम्यान जिप मुख्या कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची व वर्ग खोल्याची संख्या स्ट्रक्चर ऑडीट बाबत माहिती दिली . शाळेच्या वर्ग खोल्या बाबत शालेय समिती व मुख्याध्यापक यांनी डागडुजी दुरुस्ती बांधकाम मर्यादा मंजुरी बाबत तरतुदी बाबत माहिती दिली . दरम्यान अक्कलकोट पंचायत समितीला कार्यक्षम गटशिक्षण अधिकारी यांची नेमणुक करावी . तालुक्यात जिल्हा परिषद शाळा खालावत चाललेला दर्जा भौतीक सुविधा पोषण आहार दर्जा ‘ कमी होत असलेली पटसंख्या याबाबत पत्रकारांनी मुख्यकारी अधिकारी जैन जिप अध्यक्ष वैद्य व शिक्षणाधिकारी शेख यांच्या समोर समस्या मांडल्या . मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी ग ट विकास अधिकारी शंकर कवितके याना याबाबत अहवाल देण्याच्या सुचन्या केल्या . प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी पंधरा दिवसात तालुक्यातील जिप शाळा व पंचायत समिती शिक्षण विभागातील समस्या बाबत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे .
बबलाद जिल्हा परिषद कन्नड शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन जिप अध्यक दिपक वैद्य यांनी बुधवारी घटना स्थळास भेट दिली . शाळेचा स्लॅब कोसळला नसुन छताचा गिलावाचा पापुर्दा पडल्याचा व हा कशामुळे पडव्याचा खुलासा केला .
Post Views: 15