सोलापूर – भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक (BIGCE) येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (CSE) विभागाच्या वतीने आज अभियांत्रिकी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच CSE विभागात नव्याने प्रवेश घेतलेल्या Direct Second Year विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम CSE विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे आयोजन दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 3 ते 5 वाजेपर्यंत करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन Er. Ravindra Gaikwad Sir, सेक्रेटरी Mrs. Anamika Gaikwad, प्राचार्य Dr. Anil Deshmane आणि CSE विभागप्रमुख Prof. Anand Gyanbote यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन Ms. तेजश्री चौधरी आणि Ms. Pallavi Ahervadi यांनी प्रभावीपणे केले.
यावेळी विद्यार्थी Mr. Nilesh Madur यांनी अभियांत्रिकी दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. तसेच Ms. तेजश्री चौधरी, Prof. Chandrakant Jadhav, HOD CSE Prof. Anand Gyanbote यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य Dr. Anil Deshmane यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व, तंत्रज्ञानातील बदल आणि विद्यार्थ्यांनी कौशल्यविकासावर भर देण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी Direct Second Year मध्ये CSE विभागात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नवीन विद्यार्थ्यांना विभागाची ओळख करून देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अभियांत्रिकी क्षेत्रात देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे महान अभियंता भारत रत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचे स्मरण करून अभियांत्रिकी दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अभियंता म्हणून केवळ तांत्रिक ज्ञान न घेता समाजाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा संकल्प करावा, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून अभियांत्रिकी दिनाचा उत्सव आणि नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत असा दुहेरी आनंद विद्यार्थ्यांनी साजरा केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




















