सांगोला – सांगोल्यातील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने येथील मातोश्री वृद्धाश्रमाला एक बेड, गादी भेट देण्यात आली. मातोश्री वृद्धाश्रमात सध्या अनेक ज्येष्ठ नागरिक वास्तव्याला आहेत.
या जेष्ठ नागरिकांची सोय व्हावी म्हणून ही भेट देण्यात आली.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, महादेव दिवटे, सुरेश चौगुले, राहुल दिवटे, इंजि.विजय नागणे, डॉ.अनिल कांबळे, वृद्धाश्रमाचे सचिव अशोक जाधव यांचेसह वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.






















