सोलापूर : गोसेवा विभाग सोलापूर जिल्हा पंचगव्य डॉक्टर असोसिएशन सोलापूर जिल्हा यांच्यातर्फे पंचगव्य गुरुकुलम कांचीपुरम (तमिळनाडू) चे कुलपती डॉ. निरंजन वर्मा गुरुजी यांचे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता नवी पेठ येथील शिवस्मारक सभागृहात होणार आहे. यावेळी डॉ. निरंजन वर्मा ‘देशी गाय आणि मानवी आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या व्याख्यानास काशी पिठाचे जगद् गुरू श्रीमद काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद् गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या व्याख्यानास सोलापूरकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोसेवा विभाग सोलापूर जिल्हा पंचगव्य डॉक्टर असोसिएशन सोलापूर जिल्हा यांनी केले आहे.























