सोलापूर – बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने ‘जल्लोष लोककलेचा महोत्सव २०२६’ अंतर्गत बालरंग भूमी परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष नीलम ताई शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली एकल व समूह लोककला प्रकारांच्या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे ३ रे वर्ष असून यामध्ये बालकलाकारांसाठी विविध लोककला स्पर्धा आणि आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. अशी माहिती बालरंगभूमी परिषद सोलापूर शाखेचे कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी दिली.
या महोत्सवांतर्गत एकल नृत्य, एकल गायन, एकल वाद्य आणि समूह गायन या स्पर्धा मंगळवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोदीखाना येथील नाट्य परिषद कार्यालयातील पद्माकर देव सभागृहात पार पडणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी, बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत पार्क चौक येथील हि. ने. वाचनालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये समूह नृत्य स्पर्धा आणि भव्य पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. समूह नृत्य व समूह गीत प्रकारासाठी सर्वोत्कृष्ट ४,००० रुपये, उत्कृष्ट ३,००० रुपये आणि उत्तम २,००० रुपये अशी पारितोषिके असून, एकल गीत, एकल नृत्य व एकल वाद्यवादन प्रकारासाठी सर्वोत्कृष्ट २,००० रुपये, उत्कृष्ट १,५०० रुपये आणि उत्तम १,००० रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या महोत्सवाच्या संयोजक बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार असून, नाव नोंदणीसाठी सोलापूर शहरातून सुभाष माने(8149831344), अर्चना अडसूळ (7385198374), अन्नपूर्णा साखरे संजय सावंत, यांच्याशी तर मंगळवेढा येथून तेजस्विनी कदम व यतिराज वाकळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 11