मोडनिंब (ता. माढा) येथील श्री यमाई देवी ट्रस्टच्या वतीने श्रावण मासानिमित्त महिलांसाठी तीर्थक्षेत्र देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले. या तीर्थाटन यात्रेचे यंदाचे चौथे वर्षअसून १५१ महिलांनी यात सहभाग नोंदवला.या तीर्थयात्रेत महिलांना श्री क्षेत्र गोंदवले, औंध येथील श्री यमाई देवी मंदिर, श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर तसेच वेळापूर येथील श्री अर्धनारी नटेश्वर मंदिराचे दर्शन घडविण्यात आले.या देवदर्शन यात्रेसाठी श्री यमाई ट्रस्टच्या वतीने चार ट्रॅव्हल्सची, वाहनांची व्यवस्था करण्यात आली. प्रवासादरम्यान महिलांनी भजन, भावगीते, भक्तिगीते सादर करत संपूर्ण प्रवास भक्तिमय वातावरणात पार पडला. तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतल्यानंतर महिलांनी आध्यात्मिक अनुभूती मिळाल्याचे सांगत ट्रस्टच्या या उपक्रमाचे सहभागी महिलांनी कौतुक केले. महिलांना धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळावी, या उद्देशाने श्री यमाई देवी ट्रस्टच्या वतीने दरवर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात येते.श्री यमाई देवी ट्रस्ट जय भवानी चौक यांच्या वतीने तीर्थक्षेत्र देवदर्शन यात्रेचे हे चौथे वर्ष असून, विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
Post Views: 14