कुर्डूवाडी – सोलापूर ते कल्याण रेल्वे स्टेशन पर्यंत प्रवास करणाऱ्या एका सोने व्यापाऱ्याची बॅग चोरीला गेले ची घटना ६ डिसेंबर रात्री १०.४० मि.ते ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.५० मि.च्या दरम्यान घडली होती,याबाबत सोनी व्यापाऱ्याकडून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाचे सूत्र वेगाने फिरत सीसीटीव्ही च्या आधारे तब्बल १० चोरांचा शोध घेण्यात आला.यात माढा तालुक्यातील बारलोणी,कव्हे,वडशिंगे या गावातील व परिसरातील काही चोरट्यांचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्यानंतर लोहमार्गच्या पोलीस पथकाने सहा महिन्यांपासून वारंवार छापेमारी करत चार आरोपींना अटक करण्यात आली.त्यांच्याकडून नुकतेच सोमवारी व मंगळवारी तपासादरम्यान कुर्डूवाडी शहरातील एका नामांकित सोने व्यापाऱ्याला दिलेले ५४८ ग्रॅम म्हणजे अर्धा किलो ४८ ग्रॅमचे दागिने परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. तर याबरोबरच मुंबई येथून ३०० ग्रॅम शिलापूर येथून २५० ग्रॅम असे एकूण १ किलो १०० ग्रॅम सोने पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या गाडीमधून झोपून प्रवास करीत असताना ही घटना घडली होती.कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई लोहमार्गचे पोलीस आयुक्त एम.के.राकेश कलासागर,पोलीस उपयुक्त प्रज्ञा येडगे यांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या विशेष पथकाने चोरट्यांच्या संदर्भीय गावामध्ये वेळोवेळी छापे मारले.त्यातून रमेश बाळू डिकोळे,फुलचंद उर्फ परमेश्वर उर्फ सरपंच छगन गुंजाळ,धनराज उर्फ धनंजय उर्फ धन्या साहेबराव गुंजाळ, व पुणेकर उर्फ शिवण्या सिताराम डेकोरे या चार आरोपींना पकडण्यात त्यांना आजतागायत यश मिळाले. याआरोपींची वेळोवेळी न्यायालयाकडून पोलीस कोठडी निर्माण मंजूर करून सुमारे १ किलो १०० ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. यातील अर्धा किलो ४८ ग्रॅम सोने हे कुर्डूवाडी शहरातील नामांकित सोने व्यापाराच्या दुकानातून पोलिसांनी जप्त केले आहे.या तपासा तो नामांकित व्यापारीही गायब असल्याचे पोलिसांना दिसून आले.त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कुर्डूवाडी शहरात व सराफ कट्ट्यांमध्ये पोलीस कारवाईबाबत चर्चा असून एकच गोंधळ पुढाऱ्याचे निदर्शनास आले.
……….
चौकट-सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील सोने व्यापाऱ्याच्या दागिने चोरीच्या घटनेतील सर्व आरोपी माढा तालुक्याच्या विविध गावातील-सिद्धेश्वर एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या गोरेगाव(प) मुंबईच्या सोने दागिने विकणाऱ्या फिर्यादी व्यापाऱ्याच्या चोरीच्या घटनेतील सर्व आरोपी हे माढा तालुक्यातील विविध गावातील असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत- रमेश बाळू डिकोळे, फुलचंद उर्फ परमेश्वर उर्फ सरपंच छगन गुंजाळ,दिलीप साहेबराव गुंजाळ,धनराज उर्फ धनंजय उर्फ धन्या साहेबराव गुंजाळ, हिरा उर्फ दीपक शंकर गुंजाळ, सुरेश उर्फ लाल्या शंकर गुंजाळ, पुणेकर उर्फ शिवण्या सिताराम डिकोळे, सागर गोपाल डिकोळे, विकास शेषेराव उर्फ शशिकांत डिकोळे व भारत रामा काळे अशा दहा आरोपींची नावे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहेत.
Post Views: 12