जेऊर – उमरड (ता.करमाळा) येथे हनुमान जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच बजरंग बली हनुमानजी चा अभिषेक करून गावकऱ्यांनी देवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
सकाळच्या सत्रात ह भ प दयानंद महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले. त्यांनी आपल्या कीर्तनातून बजरंग बली हनुमान शक्ती व भक्तीचे द्वैतक असल्याचे सांगितले कीर्तनसेवेनंतर सर्व गावकऱ्यांना निवडक गावकऱ्यांतर्फे भोजन देण्यात आले. सायंकाळी हनुमानाजीची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली.
या मिरवणुकीत गावातील अनेक तरुण आनंदाने सहभागी झाले होते. ही संपूर्ण जयंती पार पाडण्यासाठी कैलास इटकर व त्यांचे सहकारी मित्र सक्रिय सहभागी झाले होते.
















