बार्शी – तालुक्यातील पानगाव येथील संत तुकाराम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रशालेत आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आनंद कसबे यांनी केले. इयत्ता दहावीमधील गुणवंत विद्यार्थी प्रथम क्रमांक कु.अंकिता काळे, द्वितीय श्रावणी काळे तृतीय ,माधुरी मोरे तसेच इयत्ता बारावीमधील गुणवंत विद्यार्थी प्रथम क्रमांक दीक्षा ताटे, द्वितीय साक्षी काळे व अमृता जाधव, तृतीय आरती वलगुडे यांचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आनंद कसबे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संतोष कानगुडे, प्रकाश कानगुडे, आबासाहेब ताटे, नितीन काळे, चंद्रकांत जाधव, नितीन शिंदे, भारत ताटे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे कष्ट, पालकांचा पाठिंबा, शाळेचे नियोजन या त्रिसूत्रीचे हे यश असल्याची भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी देखील यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता यादव यांनी तर आभार सुदर्शना कदम यांनी मानले.
Post Views: 4