सोलापूर – घरगुती वादातून एका पती-पत्नीस लोखंडी रॉड व लाकडाने तसेच लाथा बुक्क्याने मारहाण करण्यात आल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील पिंपळा बु . ( ता तुळजापूर ) येथे गुरुवारी रात्री आठ वाजता घडली .
शरद झुंबर काळे (वय 60 वर्ष ) आणि चित्राबाई शरद काळे (वय 50 वर्ष , दोघे राहणार पिंपळा (बु ) तामलवाडी ) असे त्या मारहाण झालेल्या पती-पत्नीचे नाव असून गुरुवारी रात्री त्यांना राहत्या घरासमोर अतिश शरद काळे ,शहाजी विलास शिंदे व इतर तीन जणांनी मिळून मारहाण केली . यात शरद यास डोक्याला जखम व हातापायास मुक्का मार आणि त्यांच्या पत्नी ला सर्व अंगाला मुक्कामार लागल्याने त्यांना उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात जावई संजय चव्हाण यांनी रात्री दहा वाजता दाखल केले .
Post Views: 14