सोलापूर – शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने एका शेतकऱ्याला खोऱ्याने मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली .
राजूभाई हुसेनी फकीर ( वय 50 वर्ष , राहणार वांगी )असे त्या जखमी शेतकऱ्याचे नाव असून ते गुरुवारी सायंकाळी वांगी येथील शेतामध्ये असताना त्यांना महादेव तानाजी ठेंगे यांनी खोऱ्याने मारहाण केली . यात डोक्याला जखम व सर्व अंगाला मुका मार लागल्याने त्यांना मंद्रूपच्या आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून येथील शासकीय रुग्णालयात मुलगा शाहनवाज यांनी सायंकाळी दाखल केले.
Post Views: 12