Sunday, November 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

करमाळा तालुक्यात तातडीने चारा डेपो सुरू करा!

तरुण भारतbyतरुण भारत
November 29, 2026
in west maharashtra
0
करमाळा तालुक्यात तातडीने चारा डेपो सुरू करा!
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
जेऊर – करमाळा तालुक्यात निर्माण झालेल्या  दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व पशुपालकांसमोर जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली असून जनावरांचे संगोपन करणे पशुपालकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने तालुक्यातील विविध गावांमध्ये चारा डेपो सुरू करून मुरघास (सायलेज), हिरवा चारा व पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य मा. बाळासाहेब बिचितकर यांनी तहसीलदार, करमाळा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
करमाळा तालुक्यात दूध व्यवसाय हा अनेक शेतकरी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. मात्र, चारा व पाणीटंचाईमुळे दूध उत्पादनात घट होत असून पशुपालकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांवर तर आर्थिक अडचणींमुळे आपली जनावरे विकण्याची वेळ येत आहे. ही बाब ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त गावांमध्ये तातडीने चारा डेपो सुरू करावेत, मुरघास व हिरवा चारा अनुदानित दरात उपलब्ध करून द्यावा, लहान व अल्पभूधारक शेतकरी तसेच दूध उत्पादक पशुपालकांना प्राधान्य द्यावे, चारा व पाणीटंचाईचा सर्वे करून आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि गरजेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी व शेतकरी-पशुपालकांना दिलासा द्यावा. अन्यथा शेतकरी व पशुपालकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असा इशाराही बाळासाहेब बिचितकर यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, सोलापूर तसेच उपविभागीय अधिकारी, माढा विभाग, कुर्डुवाडी यांना माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.
— मा. बाळासाहेब बिचितकर
पंचायत समिती सदस्य, करमाळा
Views: 8
Previous Post

कौस्तुभ ब्राम्हण वधू-वर अंकाचे प्रकाशन

Next Post

भरधाव आयशर टेम्पोची रस्त्याकडेला उभ्या दोघांना धडक; एकाचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भरधाव आयशर टेम्पोची रस्त्याकडेला उभ्या दोघांना धडक; एकाचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी

ताज्या बातम्या

बार्शी शहराला टँकरने पाणीपुरवठा करा –आ. दिलीप सोपल

November 29, 2026
स्व. हरिश्चंद्र फाउंडेशनचे राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार जाहीर

स्व. हरिश्चंद्र फाउंडेशनचे राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार जाहीर

November 29, 2026

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न

November 29, 2026
फॅबटेकचा विद्यार्थी रोजगारनिर्माता व्हावा हाच ध्यास-भाऊसाहेब रूपनर

फॅबटेकचा विद्यार्थी रोजगारनिर्माता व्हावा हाच ध्यास-भाऊसाहेब रूपनर

November 29, 2026
माळशिरसच्या डॉ.अहिल्या वाघमोडे यांची लंडन येध्ये फेलो पदावर निवड

माळशिरसच्या डॉ.अहिल्या वाघमोडे यांची लंडन येध्ये फेलो पदावर निवड

November 29, 2026
जिल्ह्यातील सर्वात मोठं वटवृक्ष स्पोर्ट्स टर्फ अक्कलकोटमध्ये सुरू झाला याचा मनापासून आनंद – नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी

जिल्ह्यातील सर्वात मोठं वटवृक्ष स्पोर्ट्स टर्फ अक्कलकोटमध्ये सुरू झाला याचा मनापासून आनंद – नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी

November 29, 2026
गुणांच्या शर्यतीपेक्षा चांगला माणूस घडणे हेच खरे यश-काशिनाथ भतगुणकी

गुणांच्या शर्यतीपेक्षा चांगला माणूस घडणे हेच खरे यश-काशिनाथ भतगुणकी

November 29, 2026
मांजरी हायस्कूलचे प्रमोद डोंबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मांजरी हायस्कूलचे प्रमोद डोंबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

November 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1579947

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!