मंगळवेढा – हुलजंती गावाजवळ मंगळवेढा-उमदी मार्गावर भरधाव आयशर टेम्पोने रस्त्याकडेला थांबलेल्या दोघांना जोरदार धडक दिल्याने सुरेश भिमाण्णा करेमाळी (वय ४९, रा. हुलजंती) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्नपूर्णा म्हाळाप्पा माळी (वय ५०) या गंभीर जखमी झाल्या. हा अपघात शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला आसुन वाहान चालका विरूध्द गून्हा दाखल झाला आहे.
या बाबतचे वृ आसे की सुरेश करेमाळी हे हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (क्र. एमएच १३ एयू १९५४) रस्त्याकडेला उभी करून मावस बहीण अन्नपूर्णा यांच्याशी बोलत थांबले होते. यावेळी मंगळवेढ्याकडून उमदीकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने (क्र. एमएच ४२ बीएफ ६५३४) भरधाव वेगात रस्ता सोडून दोघांना जोरदार धडक दिली. टेम्पोचे चाक सुरेश यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चालक न थांबता पळून गेला. मात्र, सोड्डी फाट्याजवळ नागराज कनशेट्टी, सुधाकर मासाळ व ग्रामस्थांनी टेम्पो अडवून चालक अमोल महादेव भिसे (वय ३०, रा. अकलूज) याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी अन्नपूर्णा यांना मंगळवेढा येथील महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मृताच्या भावाने मंगळवेढा पोलिसांत फिर्याद दिली असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Views: 9