Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बालसंस्कार शिबिरातून चिमुकल्यांना वारकरी संस्कारांची शिदोरी

तरुण भारतbyतरुण भारत
June 13, 2026
in social
0
बालसंस्कार शिबिरातून चिमुकल्यांना वारकरी संस्कारांची शिदोरी
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी जाणाऱ्या बालपिढीला वारकरी संप्रदायाच्या संस्कारांची जोड देण्याचा स्तुत्य प्रयत्न श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था आणि हरीपाठ परिवार, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आला. अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिनाभर चाललेल्या वारकरी सांप्रदायिक बालसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
            या कार्यक्रमाची सुरुवात हरिभक्तिपरायण सदाशिव चवरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या मुला-मुलींनी शिबिरादरम्यान आत्मसात केलेल्या विविध सांप्रदायिक कला आणि संस्कारांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.याशिबिरामध्ये तब्बल ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. महिनाभराच्या कालावधीत विद्यार्थ्यांना भजनामध्ये टाळ कसा वाजवायचा, पखवाज वादनाचे प्राथमिक धडे, वारकरी दिंडीतील पारंपरिक पावले, श्रीमद्भगवद्गीतेचा बारावा आणि पंधरावा अध्याय, पांडुरंगाष्टक तसेच संप्रदायातील नित्य नमन यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
           यावेळी मार्गदर्शन करताना सदाशिव चवरे यांनी वारकरी संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. गीतेच्या अध्यायांचे नियमित पठण केल्याने मुलांची स्मरणशक्ती आणि पाठांतर क्षमता वाढण्यास मदत होते. तसेच शिक्षणासोबत स्वयंशिस्त, संयम आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची प्रेरणा वारकरी परंपरेतून मिळते, असे त्यांनी सांगितले. आजच्या काळात मुलांना मोबाईलच्या अतिरेकापासून दूर ठेवून संस्कारक्षम वाटेवर नेण्याचे कार्य करणाऱ्या बळीराम महाराज जांभळे यांच्या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
         शिबिरामध्ये श्रीमद्भगवद्गीतेच्या अध्यायांचे मार्गदर्शन ह.भ.प. गोविंद महाराज माने (दमानी नगर) यांनी केले. तर पखवाज वादनाचे प्रशिक्षण अनिकेत जांभळे यांनी दिले. टाळ, पाऊल आणि हरीपाठाचे प्राथमिक शिक्षण बळीराम महाराज जांभळे यांनी विद्यार्थ्यांना दिले. संस्कार, अध्यात्म आणि सांस्कृतिक परंपरा यांचा सुंदर संगम घडवून आणणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. शिबिराच्या माध्यमातून मुलांमध्ये भक्ती, शिस्त, संस्कार आणि सामूहिकतेची भावना रुजविण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
                शिबिर यशस्वी करण्यासाठी अंजली लोखंडे, स्वराज केसरे, तन्वी गोसावी, शौर्य भोसले आणि समर्थ कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम महाराज जांभळे यांनी केले.
Post Views: 34
Previous Post

आमदारांचे विशेष जनसंपर्क अभियानअंतर्गत वृक्षारोपण

Next Post

लायन क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्षपदी मंगेश बागुल यांची निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
लायन क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्षपदी मंगेश बागुल यांची निवड

लायन क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्षपदी मंगेश बागुल यांची निवड

ताज्या बातम्या

खत पुरवठा, काळाबाजार आणि लिंकिंगच्या प्रश्नावर केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका

July 28, 2026
शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

July 28, 2026
महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

July 28, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या जाहिराती अचानक रद्द; प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

July 28, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 28, 2026
आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

July 28, 2026

तीनदा बदली, सुट्टीच्या दिवशी आदेश; आरोग्य विभागातील गैरव्यवहाराची चौकशीची मागणी

July 28, 2026

अधिकार नसताना बिलांचा व्यवहार; ग्रामसेवक निलंबित

July 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1009698

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!