हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात मान्सून लवकरच एंट्री करणार आहे. मात्र, दुसरीकडे राज्यात मात्र पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी दोन दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचीदेखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामध्ये सोलापूर, पुणे, जळगाव, धुळे, सातारा, कोल्हापूर तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यामुळे देशातील बहुतेक भागात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक शहरात 40 अंशापेक्षा जास्त तापमान असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे मान्सूनची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहे.