सोलापूर – वामसी लॅब्स लिमिटेड यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या येथील एम एस एल टी ए टेनिस सेंटरच्या वातानुकूलित ड्रेसिंग रूमचे उद्घाटन वामसी लॅब्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक एम केशव रेड्डी यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष राजेश दमाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी राजीव देसाई, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू संध्याराणी बंडगर , दिलीप बचुवार, नेव्हिल पिठावाला, उपाध्यक्ष नागराज अलवाल, प्रकल्प व्यवस्थापक प्रकाश बोगा , एच आर व्यवस्थापक स्नेहल माने आणि कंत्राटदार प्रदीप कोंडले उपस्थित होते.
या उद्घाटनामुळे एमएसएलटीए टेनिस सेंटर येथील खेळाडूंसाठीच्या सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे.
Post Views: 8