Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नालेसफाईतील कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवाल आयुक्तांना सादर

तरुण भारतbyतरुण भारत
August 19, 2026
in solapur
0
नालेसफाईतील कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवाल आयुक्तांना सादर
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : नालेसफाई व रेंडीकरणाच्या कामासाठी रंजित टूर्स अँड ट्रॅव्हल्सला दिलेल्या कामाच्या दरांमध्ये मोठी तफावत असताना त्यास तांत्रिक मंजुरी देणे, विभागीय मंजूर दरांचा पुरेसा विचार न करणे, तसेच कामाच्या प्रक्रियेत आवश्यक समन्वय न साधल्याचा ठपका चौकशी समितीकडून नगर अभियंता सारिका आकुलवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच नगर अभियंता,
रणजीत टूर्स अँड ट्रॅव्हल्ससह 19 कर्मचारी अधिकाऱ्यांवर  ठपका ठेवण्यात आला आहे, असे सांगतानाच याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी तक्रारदार भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
     सोलापूर शहरातील नालेसफाई कंत्राटातील कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी सभागृहात आणि निवेदनाद्वारे केली होती. याप्रकरणी कॉपी-पेस्ट बिले तयार करणे तसेच 83 लाखाची तफावत आढळून आल्याचे आरोप नगरसेवक जाधव यांनी केले होते. प्रकरणी नगर अभियंता यांना चौकशी होईपर्यंत या पदावरून दूर ठेवावेत अशी मागणी ही त्यांनी केली होती. दरम्यान महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमली होती. अतिरिक्त आयुक्त विना पवार, मुख्य लेखाधिकारी डॉ. रत्नाराज जवळगेकर, मुख्य लेखा परीक्षक सदानंद वाघमोडे आणि उपअभियंता आनंद जोशी यांच्या चौकशी समितीने आपला अहवाल महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे सादर केला आहे.
     या अहवालाची माहिती तक्रारदार अनंत जाधव यांनी आज पत्रकारांना दिली. या चौकशी अहवालातील मुद्द्यांची माहिती देतानाच या प्रकरणी ठपका ठेवण्यात आलेल्या संबंधित १९ जणांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.महापालिकेच्या उपलब्ध चौकशी टिपणीनुसार, या प्रकरणात नावाने थेट जबाबदारी निश्चित करण्यात आलेल्या अधिकारी सारिका आकुलवार आहेत. मात्र रणजीत टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंत्राटदाराच्या दर व कामकाजावरही अहवालात गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
नालेसफाईसाठी एक्स्कॅव्हेटर लॉंग बूमचा दर ४,८०० रुपये प्रतितास, तर शॉर्ट बूमसाठी ३,२०० रुपये प्रतितास असा दर मंजूर करण्यात आला. उपलब्ध विभागीय डीएसआर व अन्य मंजूर दरांच्या तुलनेत हे दर जास्त असल्याचे चौकशी टिपणीत नमूद आहे. विशेष म्हणजे कमी दरात काम करण्यास तयार असलेल्या अन्य कंत्राटदारांच्या दरांचा तुलनात्मक विचार न करता रंजित टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या दरांनाच प्राधान्य दिल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
चौकशी टिपणीनुसार, वाहन व यंत्रसामग्रीच्या वापराबाबत दिलेल्या कामाच्या आदेशात काही वाहने समाविष्ट नसतानाही त्यांचा वापर व देयकांचा प्रस्ताव पुढे करण्यात आला. संबंधित कामासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच काही वर्कऑर्डर देण्यात आल्याचेही निदर्शनास आले. जीपीएस यंत्रणा नसणे, वाहनांच्या अनुभवाबाबत पुरेशी पडताळणी न करणे आणि बिलांच्या तपासणी प्रक्रियेत त्रुटी राहिल्याचेही टिपणीत नमूद आहे.
        सारिका आकुलवार यांनी एकूण ११ बिले रिकव्हरिंगसाठी सादर केली होती. त्यामध्ये मोठ्या रकमेची तफावत आढळून आल्यानंतर वसुलीचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, बिले व कामाच्या जबाबदारीबाबत वारंवार बदलणारी भूमिका, वरिष्ठांशी अपेक्षित समन्वयाचा अभाव आणि आर्थिक बचतीऐवजी अधिक दराचा प्रस्ताव स्वीकारल्याने महापालिकेच्या आर्थिक हिताला बाधा पोहोचू शकते, असे चौकशी समितीने नमूद केले आहे.
        सन 2025/26 मध्ये शहरातील आठ विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नाले सफाई मध्ये घोटाळा झाला असल्याचा प्रकार भाजपाचे नगरसेवक अनंत जाधव यांनी निदर्शनास आणून दिला होता त्यावर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी चौकशी समिती नेमली असून त्याचा अहवाल नगरसेवक जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये सादर केला. त्यानुसार या कथित नालीसफाई घोटाळा प्रकरणी 19 जणांवर ठपका ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.जाधव यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करावा असे निवेदनही आयुक्तांना दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नालेसफाईची ही प्रक्रिया पूर्णपणे चुकीची असून आजवर नक्की कोणत्या दराने ही बिले काढली? आहेत याचा उल्लेख यामध्ये नाही. एकूण साडेतीन कोटींची बिले यासाठी देण्यात आलेली असून त्यापैकी एक कोटी 40 लाख रुपयांची बिले अदा करण्यात आलेली आहेत. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये कमी दराने हे काम घेणारा मक्तेदार उपलब्ध असला तरी अधिकच्या दराने रणजीत टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांना हा मक्ता देण्यात आला. हा सर्वसामान्य जनतेचा पैसा असून या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी करण्यात यावी, अशी मागणी अनंत जाधव यांनी केली आहे.
90 लाख नाही दीड कोटी
आयुक्तांकडून प्राप्त चौकशी अहवालामध्ये नगर अभियंता अकुलवार यांच्याकडून नजरचुकीने हिशोब चुकला आणि त्याद्वारे 90 लाख रुपयांची बिले आता करण्यात आल्याचे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात तो आकडा कमीत कमी दीड लाखांच्या वर आहे असे जाधव यांनी म्हटले आहे.
अहवालात 19 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ठेवला ठपका
प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवर, प्रभारी सीनियर फोरमन गिरीश पुकाळे, तत्कालीन झोनल अधिकारी सुनिता हिबारे, तत्कालीन सहाय्यक अभियंता शाम कन्ना, तत्कालीन मानधन वरील कनिष्ठ अभियंता आकाश पाटील, तत्कालीन विभागीय अभियंता हनीफ बक्षी, मानधन कनिष्ठ अभियंता निलेश कंदलगावकर, तत्कालीन विभागीय अधिकारी किशोर तळीखेडे, कनिष्ठ अभियंता परशुराम बोमकंटी, कनिष्ठ अभियंता संजय पाटील, तत्कालीन झोन अधिकारी जावेद पानगल, सहाय्यक अभियंता प्रकाश सावंत, सहाय्यक अभियंता राघवेंद्र गायधनकर, कनिष्ठ अभियंता ए. ए. विपत,  कनिष्ठ अभियंता सहाय्यक अभियंता श्रीरंग नादरगी, कनिष्ठ अभियंता एम. क्यू. लायका, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी, कनिष्ठ अभियंता मनोज जाधव आणि रणजीत टूर्स ट्रॅव्हल्सचे रणजीत भंडारे यांच्यावर या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे.
सात दिवसात खुलासा मागविणार : डॉ. सचिन ओम्बासे
याप्रकरणी ठपका ठेवण्यात आलेल्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यासाठी सात दिवसाची मुदत देण्यात येत आहे. त्याचबरोबर गंभीर आरोप असलेल्या संबंधितांना संबंधितांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली
Post Views: 64
Previous Post

खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांचा पाठपुरावा

Next Post

दि. ग्रीनफिंगर्स स्कूलमध्ये स्वातंत्रदिन उत्सहात साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दि. ग्रीनफिंगर्स स्कूलमध्ये स्वातंत्रदिन उत्सहात साजरा

दि. ग्रीनफिंगर्स स्कूलमध्ये स्वातंत्रदिन उत्सहात साजरा

ताज्या बातम्या

आमदार पडळकर आणि मराठा आंदोलक आमने सामने #viral #marathinews

September 5, 2026

बापूजी नगरातील वादग्रस्त समाजमंदिर महापालिकेने घेतले ताब्यात

September 5, 2026

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी केली मार्गांची पाहणी #solapurnews #news

September 5, 2026

श्रावण शुक्रवार निमित्त विठ्ठल रुक्मिणीस सुवर्ण अलंकारांनी नटविले #viral #marathinews #news

September 5, 2026

वालचंद कॉलेज समोरचे अतिक्रमण हटवले

September 5, 2026

शहर मध्यचा पूर्ण विकास करेन – आमदार कोठे #solapurnews #viral

September 5, 2026
ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

September 4, 2026
ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1165376

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!