
मोहोळ – यावर्षी आपण प्रचंड उन्हाळा अनुभवला यापुढेही असे सोन्याचे चटके सोसायला लागू नये म्हणून वृक्षारोपण करून ते जोपासणे आवश्यक आहे त्यामुळे झाडांचे महत्त्व अबाधित आहे. पृथ्वीचे रक्षण करायचे असेल तर आणि पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर झाडे लावून जोपासणे आणि वाढवणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा मोहोळदक्षिण मंडलाच्या सरचिटणीस सौ दिपाली कोरे यांनी केले.
शुक्रवारीदि.५जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोहोळ तालुक्यातील तरटगांव – शिंगोली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षारोपण करण्यात आले . त्यावेळी त्या बोलत होत्या . सौ . दिपाली कोरे भाजपा सरचिटणीस महिला मोर्चा (दक्षिण मंडल )यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावर्षी जांभूळ,वड आणि पिंपळ, नारळ, प्रजातीची झाडे लावण्यात आली. या उपक्रमाचे हे सलग ४थे वर्ष असून आत्तापर्यंत दहा झाडे जगविण्यात आली आहेत. यासाठी भाजप दक्षिण मंडळाचे अध्यक्ष रमेश माने , जिल्हा चिटणीस आणि विधानसभा प्रमुख महेश सोवनी आणि जिल्हा सदस्य अविनाश पांढरे यांचे मार्गदर्शन लाभले.शिंगोली तरडगाव सारख्या छोट्याशा गावात महिलांनी केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे अशी प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त होत आहे* .या निमित्त
मंजुळा बिराजदार . अनुसया वाघमारे,मीनाक्षी अधटराव,छाया वाघमारे,विद्या बसाटे,पुतळाबाई वाघमारे,कमल कोरे,गावातील महिला उपस्थित होत्या .मंडळ अध्यक्ष रमेश माने यांचे मार्गदर्शन लाभले .
Post Views: 12