Sunday, September 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुंभारी ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा

तरुण भारतbyतरुण भारत
June 5, 2026
in solapur
0
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुंभारी ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – “निरोगी आरोग्यासाठी स्वच्छ पर्यावरण अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छता, शुद्ध पाणी, प्रदूषणमुक्त परिसर आणि वृक्षसंवर्धन यांचा थेट संबंध नागरिकांच्या आरोग्याशी आहे. प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासोबत आरोग्य संवर्धनालाही प्राधान्य द्यावे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या श्रुतीताई भोरगुंडे यांनी केले.
तर, “पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. आजच्या पिढीने वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तरच भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळू शकेल,” असे सरपंच  श्रुतीताई निकंबे यांनी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  कुंभारी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विशेष ग्रामसभेत त्या बोलत होत्या. ग्रामपंचायत सरपंच  श्रुतीताई निकंबे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा उत्साहात पार पडली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रेमदास पवार यांनी पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करताना सांगितले की, “पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. स्वच्छता, वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा स्वीकार केल्याशिवाय निरोगी व शाश्वत भविष्य घडू शकत नाही.”
यावेळी पंचायत समिती सदस्य सुरज पाटील, माजी सरपंच गेनसिद्ध भोरगुंडे, माजी उपसरपंच विजयकुमार शबाशे, महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष निकंबे, नागनाथ निकंबे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. मंगरुळे मॅडम, ग्रामपंचायत कर्मचारी महादेव माळी, शशिकांत बिराजदार, जेटप्पा नाटेकर, राजकुमार पट्टणशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
विशेष ग्रामसभेत “स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू” या संकल्पनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र शासनाच्या मिशन लाईफ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वेगळा संकलित करण्याची आवश्यकता तसेच सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याबाबत मार्गदर्शन  करण्यात आले.
 पंचायत समिती सदस्य सुरज पाटील यांनी स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. “माझे गाव – आरोग्यसंपन्न गाव” या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाने स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
ग्रामसभेत वृक्षलागवड, पाणी संवर्धन, कचरा निर्मूलन आणि प्लास्टिकमुक्त गाव या विषयांवर ग्रामस्थांनीही आपली मते मांडली. पर्यावरण संरक्षणासाठी गावपातळीवर विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
ग्रामसभेनंतर ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत ग्रामस्थांमध्ये सकारात्मक जागृती निर्माण झाली असून कुंभारी ग्रामपंचायतीने हरित, स्वच्छ व पर्यावरणपूरक गाव निर्मितीकडे आणखी एक भक्कम पाऊल टाकल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Post Views: 94
Previous Post

केदारनाथ मंदिरासमोर हलग्यांच्या कडकडाटात नाचवली महूदची कावड

Next Post

झाडे लावून जोपासणे आणि वाढवणे महत्त्वाचे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
झाडे लावून जोपासणे आणि वाढवणे महत्त्वाचे

झाडे लावून जोपासणे आणि वाढवणे महत्त्वाचे

ताज्या बातम्या

असा रंगला दहीहंडीचा सोलापुरातल्या बाळीवेसेत उत्सव #viral #solapurnews #aajsolapur #news

September 5, 2026
विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

September 5, 2026
कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

September 5, 2026

तरुणाई नशेच्या विळख्यात, आडोशाच्या ठिकाणी नशा पार्टीचा वाढतोय धोका

September 5, 2026
पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

September 5, 2026

यूपीएल कंपनी माळशिरस तालुक्यात डाळिंब ऊस केळी पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट राबवणार – वरूण श्रॉफ

September 5, 2026

शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार — डॉ. संजयकुमार भोसले

September 5, 2026

वारीच्या स्वच्छतेवर साडेतीन कोटींचा खर्च;  शौचालये, सफाईचा हिशेब कागदावरच?

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1166831

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!