सांगोला – सांगोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधा जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेने जनसंवाद अभियान आयोजित केले होते. ते उत्साहात पार पडले. या अभियानादरम्यान रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानकावर उपस्थित प्रवाशी, संघटना यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी रेल्वे सुरक्षा बल सोलापूरचे मंडल सुरक्षा आयुक्त अनिलकुमार सिंह, शहीद अशोक कामटे संघटनेचे निलकंठ शिंदे, स्टेशन प्रबंधक अजय कुमार यादव, उपस्टेशन प्रबंधक अशोक खोजा, रेल्वे सल्लागार समिती सदस्य मकरंद पाटील उपस्थित होते. प्रवाशांना मिळणाऱ्या विविध सुविधा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षा यंत्रणा, तिकीट बुकिंग व्यवस्था आणि गाड्यांच्या वेळेबाबत प्रवाशांचे अभिप्राय नोंदवून घेण्यात आले. स्थानकावरील स्वच्छताबाबत प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी शहरातील नागरिक, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट-
नागरिक आणि प्रवाशांनी सुचवलेल्या मागण्या तसेच अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने करण्यात यावेळी आली आहे. रेल्वे प्रशासन आणि नागरीक यांच्यात थेट संवादाचे व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभारी आहोत.
-निलकंठ शिंदे, अध्यक्ष, अशोक कामटे संघटना, सांगोला.