साेलापूर -एका ज्येष्ठ महिलेच्या घरातून अज्ञात चोरट्याने बेडरूममध्ये ठेवलेली बॅग पळवून त्यातील २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केलेत.ही घटना विजापूर रोडवरील सैफुल येथील कित्तूर चन्नम्मा नगर भागात घडली. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हेमलता कृष्णकुमार लकुरी (वय ६३, रा. कित्तूर चन्नम्मा नगर, सैफुल, सोलापूर) यांनी फिर्याद दिली. याची फिर्यादी सदर ठिकाणी आपल्या कुटुंबासह राहतात. दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या व्हॅनिटी बॅगमधून औषधाच्या गोळ्या घेतल्या आणि बॅग बेडवरच ठेवून दिली होती. त्यानंतर रात्री ९ वाजता दुसऱ्यांदा औषध घेण्यासाठी त्यांनी पाहिले असता बॅग गायब असल्याचे लक्षात आले. घरातील सर्व ठिकाणी शोधाशोध करूनही बॅग मिळून आली नाही. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून ६० हजार रुपयांची २ तोळ्यांची सोन्याची साखळी, १ लाख ८० हजार रुपये किमतीचा ६ तोळ्यांचा सोन्याचा अशोक हार, २४ हजार रुपयांचा ८ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, ६ हजार रुपयांचे २ ग्रॅमचे काळेमणी मंगळसूत्र, १५०० रुपयांच्या ३ ग्रॅम चांदीच्या साखळ्या आणि १५ हजार रुपये मूल्याचे ३ तोळ्यांचे चांदीचे बाजूबंद असा एकूण २ लाख ८६ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार शितलकुमार गायकवाड करत आहेत.
Post Views: 10