जेऊर – करमाळ्यातील यशकल्याणी सेवा भवन येथे “कारगिल विजय दिवस” उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटना करमाळा तालुका अध्यक्ष श्री, अक्रूर शिंदे आणि यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्री, गणेश करे पाटील यांनी दिली आहे.
भारतीय सैनिकांनी पराक्रम गाजवत कारगिल युद्धात पाकिस्तान वरती मिळवलेला विजय अभूतपूर्व आणि सर्व भारतीयाच्या अस्मितेला जागवणारा व अभिमानास्पद असून आपल्या शुर सैनिकांप्रती आदर व्यक्त करून बलिदान दिलेल्या वीर हुतात्म्यांचे स्मरण व्हावे म्हणून दरवर्षी हा दिवस यशकल्याणी सेवाभवन करमाळा येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .
27वर्षांपूर्वी मिळवलेल्या विजयाचा आनंद आणि देशासाठी वीरगती झालेल्या व शहीद जवानांचे स्मरण करण्यासाठी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो यावर्षी विजयाचे 27 वर्ष पूर्ण झाले असून कारगिल विजय दिवस देशभर साजरा केला जातो हेच औचित्य साधत आजी- माजी सैनिक कल्याणकारी संघटना करमाळा व यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा यांचे संयुक्त विद्यमाने 26 जुलै 2026 रोजी कारगिल विजय दिवस या समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या समारंभासाठी तालुक्यातील शहीद जवान परिवारातील वीर पत्नी ,वीर माता, वीर पिता, व आजी -माजी सैनिक, सैनिक परिवार, व समस्त देशप्रेमी करमाळकर यांनी या शूर वीरांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आजी – माजी सैनिक कल्याणकारी संघटना करमाळा व यशकल्याणी परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे .
Post Views: 16