कुर्डूवाडी – आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ माढा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘*सुरक्षित बचपन अभियान*अंतर्गत कायदेशीर जनजागृती व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह दिवाणी न्यायाधीश पी. जी. लंबे साहेब, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्यायाधीश बी. आर. झेंडे साहेब उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक मोहिते साहेब, अॅड. आडकर सर, पोलीस उपनिरीक्षक पवार साहेब ,अॅड. एस. एस. जगताप, अॅड. एन. के. तांबिले व अॅड. ए. एम. जगदाळे मॅडम पाहुणे म्हणून लाभले. न्यायाधीश झेंडे साहेबांनी बालपण सुरक्षित राखण्यासाठी तक्रार करणे धैर्य असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्याचा मोलाचा संदेश दिला. न्यायाधीश लांबे साहेबांनी संकटात न घाबरता पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. अॅड. तांबिले यांनी सोशल मीडियाचे धोके व ‘चाइल्ड हेल्पलाईन १०९८’ ची माहिती दिली, तर अॅड. जगदाळे मॅडम यांनी पॉक्सो कायदा लिंगभेद मानत नाही, असे स्पष्ट केले.
शाळेचे अध्यक्ष अमोल सुरवसे व संचालिका पूजा सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास प्राचार्य, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 12