पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे दुष्काळाच्या सावटाखाली गणरायाचे मोठ्या जल्लोषात व उस्हात स्वागत. सकाळपासुनच पिलीव बाजारपेठेत गणेश मुर्ती व डेकोरेशन साहित्याची खरेदीची लगभग दिसुन येत होती. तर सायंकाळी गावातील तब्बल अठरा मंडळानी ढोल ताशयांचया व पारंपारिक वाद्यांच्या गजरात पिलीव बाजारपेठेतुन गणेश मूर्तीची मिरवणुक काढीत मूर्तीची प्रतिष्ठापणा केली .यामध्ये सिद्धीविनायक मंडळाने तर बघलगाडीतुन मिरवणुक काढली, तसेच संग्राम गणेश मिञ मंडळ, अष्टविनायक गणेश मिञ मंडळ, नरसिंह प्रतिष्ठान, व्यापारी प्रतिष्ठान, श्रीकृष्ण गणेश मिञ मंडळ, शिवप्रताप प्रतिष्ठान, गजराज, महाराणा प्रताप, श्रीदत गणेश मिञ मंडळ, नरविर उमाजी नाईक गणेश मिञ मंडळ, विघ्नहर्ता गणेश मिञ मंडळ, झिंजेवस्ती येथील सिध्दनाथ गणेश मिञ मंडळ, श्रीराम गणेश मिञ मंडळ, यासह पिलीव परीसरातील सर्वच गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहात वाजत गाजत गणेश मूर्तीची मिरवणुक काढीत प्रतिष्ठापना केली.पिलीव येथे जवळपास 19 गणेश मिञ मंडळांनी यंदा सहभाग घेतला असुन याठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच मिरवणुकीदरमयान विविध कार्यक्रम गणेश भक्तांना पाहवयास मिळणार आहेत. फोटो _ पिलीव येथील सिध्दीविनायक गणेश मिञ मंडळाने बैलगाडीतून काढलेली मिरवणुक.