कुर्डूवाडी – येथील नगर परिषद सभागृहात अत्यंत उत्साहात महावीर जन्म कल्याणक साजरे करण्यात आले. यावेळी कै काशिनाथ भिसे सभागृहात नगराध्यक्ष जयश्री भिसे, यांच्या हस्ते भगवन महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .उपनगराध्यक्ष सविता जगताप ,नगरसेविका वृषाली गांधी, मोहसिन मकणु,संजय टोणपे,शुभ्रा गोरे, वासिम मुलाणी,आनद कदम, शकील तांबोळी ,अबोली चौधरी ,भाग्यश्री पाटील, बापूसाहेब जगताप,संतोष क्षीरसागर ,विशाल गोरे आदि नगरसेवक यावेळी उपस्थित होते. महावीर भगवान कि जय ,अहिंसा परमो धर्म कि जय अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.
यावेळी प्रशासन अधिकारी बापू चौबे, महेश गांधी ,चेतन शहा, केतन संचेती,नितीन दोशी, अनुप दोशी,अँँड .com प्रमोद पलसे, डॉ.प्रवीण तांबोळी,मनोज खडके,केशर सोनिमिंडे,किरण दोशी,नितीन पापरीकर,राजेश गांधी,संदीप दोशी, सुनील पुरवत,संजय पुरवत,आरिहंत कोठारी ,निखील धोका,राहुल शहा,सुगंध धर्मराज,विजयकुमार पालिया,नितीन दोशी ,जयंत पुरवत ,संतोष दोशी,संजय देशमाने ,महावीर देशमाने, सचिन शहा,वैशाली शहा,सायली शहा, स्नेहल पुरवत,प्रीती गांधी,माधुरी शहा ,पल्लवी शहा ,मयुरी शहा ,निकिता दोशी, रिया शहा ,पद्मा देशमाने ,विद्या रणदिवे आदि यावेळी उपस्थित होते.यावेळी नगरसेविका वृषाली गांधी, वैशाली शहा,रिया गांधी यांनी भगवान महावीरांच्या विषयी माहिती दिली .
सकल जैन समाजाची शोभा यात्रा संपन्न
कुर्डूवाडी शहरात दिगंबर श्वेतांबर सकल जैन समाजाने भगवान महावीर जन्म कल्याणक निम्मित शोभा यात्रा काढली. ढोल ताशा बँडच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून श्रावक ,श्राविका, महावीरांची पालखी,भगवान महावीरांचे तैलचित्र असलेली प्रतिमा भगवान महावीर स्वामी कि जय असा जय घोष करत मार्गस्त झाली.शहरात ठीक ठिकाणी भगवान महावीरांच्या पालखीचे पूजन करण्यात आले.















