अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून एकाच छताखाली स्वामी भक्तांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे व्यवस्थापन उत्कृष्ठ असल्याचे मनोगत आमदार कैलास पाटील (वि.स.स.)-धाराशिव यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सो.म.पा. नगरसेवक अमोलबापू शिंदे, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार विनायक मगर, न.प. मुख्याधिकारी रमाकांत डाके आदिजण उपस्थित होते.
यावेळी न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी, अतिश पवार, स्वामिनाथ बाबर, रोहन शिर्के, शुभम सावंत, शहाजी यादव, एस.के.स्वामी, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, संतोष माने, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, दत्ता मोरे, किरण साठे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.